बीड (प्रतिनिधी):- केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने निदर्शने करून केंद्रीय आयकर विभागाचा निषेध नोंदवण्यात आला.
एकच वादा, अजितदादा! केंद्रीय आयकर विभागाचा धिक्कार असो, या केंद्रातील भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय अशा घोषणा परिसर दणाणून गेला होता. इतिहास साक्षीला आहे, महाराष्ट्र कधी झुकत असो, दिल्ली असो या कुणीही यापुढे वाकत नसतो असा इशारा देत आम्ही पवार कुटुंबियांवर जिवावर उदार होवून प्रेम करतो म्हणून तुम्ही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट ताकदीने पलटवार करू, आता धाडी थांबवा नाही तर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरूणाचा हा संयमाचा बांधा फुटेल असा इशाराही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिला आहे.
यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, सुडबुद्धीने छापेमारी करणार्या केंद्रीय आयकर विभागाच्या निषेधार्थ ही निदर्शने करत आहोत. अजित दादांवर अनेकदा आरोप, टीका झाली आम्ही संयमाने प्रतिउत्तर दिले. पण तुम्ही जर विनाकारण आमच्या आई, बहिणींच्या घरी धाडी टाकून प्रसिद्धीचा आव आणत असाल तर जास्त काळ सहन करणार नाही. आम्ही पवार कुटुंबियांवर जीवावर उदार होवून प्रेम करतो. तुम्ही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. जेवढ दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट ताकदीने पलटवार करू, आता धाडी थांबवा नाही तर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरूणांचा संयमाचा बांधा तुटेल असा इशारा यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होत.