October 17, 2021

लाचखोर तलाठी गजाआड !

लाचखोर तलाठी गजाआड !

बीड | वार्ताहर
सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

पिंपळा येथील सज्जाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (४९) हा सातबारावर पत्नी व नातेवाईकांचे वारस नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीच्या बीड कार्यालयाकडे केली होती त्याच वेळी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणीही केली गेली होती. दरम्यान, यानंतर बुधवारी एसीबीने  आष्टी तहसिल कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. तहसिल परिसरात तलाठी नरसाळे याने लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्याला गजाआड केले. 

पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ, कर्मचारी श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तलाठी जालिंदर नरसाळे विरोधात आष्टी पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *