December 6, 2022

पाच जिल्ह्यात भाजपला मोठे यश ! महाविकास आघाडीला संमिश्र !!

पाच जिल्ह्यात भाजपला मोठे यश ! महाविकास आघाडीला संमिश्र !!

मुंबई – पाच जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे,महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे .नागपूरमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपने बाजी मारली आहे .

धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली

धुळे – 15 (भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, इतर 0)
नंदूरबार – 11 (भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस, 3 इतर 0)
अकोला – 14 (14 भाजप 1 शिवसेना 1 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 1 वंचित 9)
वाशिम -14 (भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 2, इतर 4 )
नागपूर -16 (भाजप 3, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, इतर 2)
पालघर-15 (भाजप 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 0 इतर 1)

२२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते ३ पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. या निकालाने सर्वच पक्षांना धक्का बसला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click