October 17, 2021

सहा तासात झुकेरबर्ग ला 52 हजार कोटींचा फटका !

सहा तासात झुकेरबर्ग ला 52 हजार कोटींचा फटका !

नवी दिल्ली – केवळ सहा तास साईट बंद झाल्याने अर्थात फेसबुक डाऊन झाल्यामुळे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याचं वैयक्तिकरित्या प्रचंड नुकसान झालं आहे.तब्बल 52 हजार कोटींचा फटका झुकेरबर्ग ला बसला असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत तो खाली घसरला आहे .

फेसबुकवर डाऊन झाल्याने अवघ्या काही तासात झुकरबर्गची संपत्ती 7 अब्ज डॉलर (सुमारे 52 हजार कोटी रुपये) कमी झाली आणि अब्जाधीशांच्या यादीत ते एका क्रमांकाने खाली आला आहे.

भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 10 च्या सुमारास जगभरातील फेसबुकच्या सर्व सेवा बंद पडल्या होत्या. फेसबुकच्या सेवेव्यतिरिक्त इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, अमेरिकन टेलिकॉम कंपन्या सेवा जसे की, Verizon, At&t आणि T Mobile यांच्या सेवाही अनेक तास ठप्प झाल्या होत्या.

हे सर्व पाहता, अमेरिकन शेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्सची विक्री सुरू झाली आणि एका दिवसात त्याची किंमत 5 टक्क्यांनी कमी झाली. सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबुकच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची घट झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झुकेरबर्गच्या संपत्तीत घट होऊन ती आता 120.9 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे तो बिल गेट्सच्या क्रमांकाच्या देखील खाली म्हणजे 5व्या स्थानावर गेला आहे. यापूर्वी तो या यादीत चौथ्या स्थानावर होता. या वर्षी 13 सप्टेंबरपासून त्याच्या संपत्तीत 19 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सोमवारी रात्री अनेक तास सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्यानंतर पहाटेच्या सुमारास काही सुधारणा झाल्या. पहाटे 4 च्या सुमारास फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सेवा पुन्हा सुरू झाल्या. पण यामुळे अब्जावधी यूजर्संना बराच काळ अडचणीचा सामना करावा लागला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *