October 17, 2021

अवैध बायो डिझेल पंप सील !

अवैध बायो डिझेल पंप सील !

बीड – तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बायोडिझेलचा गोरख धंदा खुलेआम सुरु आहे. वास्तविक या बायोडिझेलच्या विक्रीला प्रशासनाकडून कसलीही परवानगी नाही. असे असतांनाही तालुक्यातील बीड- गेवराई मार्गावरील हिंगणी फाटा येथे एका पेट्रोल पंपावर बायो डिझेलची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी (दि.5) दुपारी महसुल व पोलीसांच्या पथकाने संयुक्त छापा मारला. या कारवाईमुळे बायो डिझेलची अवैध विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात बायो डिझेलची विक्री केली जात असल्याची तक्रार खुद्द काही पेट्रोल पंप चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने खरच जिल्ह्यात बायो डिझेल पेट्रोल पंपावरुन विक्री केली जाते की नाही या बाबत कोणतीही माहिती पुढे आली नव्हती. दरम्यान हिंगणी फाटा येथे एका पंपावर बायोडिझेलचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय राऊत, सहाय्यक निरीक्षक उबाळे, मंडळाधिकारी नितीन जाधव, तलाठी पठाण यांच्यासह पेट्रोल कंपनीचे व्यवस्थापक यांनी पंपावर छापा मारला. तिथे काही बायोडिझेलचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले असून हा पंप सध्या चौकशी होईपर्यंत सील करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *