बीड-जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
पिक विमा च्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्यांना मिळू शकणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले जिल्ह्यातील 11 लाख 66 हजार शेतकरी सभासदांपैकी जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून पीक विम्याची नोंदणी केली आहे . सर्व शेतकऱ्यांना पिकविमाची भरपाई मिळावी यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात हाच या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे , असे पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले
ते पुढे म्हणाले , बीड जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले येथे कोकणा सारखी स्थिती आजही दिसून येत आहे आहे शेतांमध्ये पाणी साचलेले असून वीज पुरवठा चे पोल पडलेले आहेत शेत जमीन खरवडून वाहून गेली आहे अनेक ठिकाणी रस्ते हे देखील नाहीसे झालेत पाणीपुरवठा योजना बंद पडल्यात जिल्ह्यातील असंख्य गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे बंधारे केटीवेअर ज्यांचे नुकसान झाले आहे गावांमध्ये जाण्यासाठी तसेच अगदी स्मशानभूमीत देखील जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व शासकीय व कार्यान्वयन यंत्रणांनी वेगवान काम केले पाहिजे व सुविधा पूर्ववत केल्या पाहिजेत असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले
मंत्री महोदय म्हणाले, नद्यांनी पात्र बदलण्याचा घटना देखील ठरले आहेत अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील वांनीर नदीचे पात्र तीन ठिकाणी तयार झाले आहे असे सांगून ते म्हणाले नुकसानीचे पंचनामे करताना नियमां पेक्षा सद्यस्थितीचा विचार करून तातडीने अहवाल दिले जावे जेणेकरून शासनास मदत पोहोचवणे शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री मुंडे यांनी केले
यावेळी बैठकीमध्ये खासदार रजनी पाटील यांनी पिक विमा मध्ये ऊस पिकाचा समावेश नसून या अतिवृष्टी मध्ये जिल्ह्यातील उसाचे पीक देखील उध्वस्त झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सूचना केली.
जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला.
आमदार श्री सोळंके यांनी गावातील पाणीपुरवठा योजनांचे झालेले नुकसान नमूद करताना महावितरणने तालखेड येथे पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याचा उल्लेख केला.
आमदार क्षीरसागर यांनी आपत्ती मध्ये भिंत पडून मृत झालेल्या व्यक्तीसह ४ घटनांमधील मृतांच्या मदतीबाबत सूचना मांडली
आमदार आजबे यांनी पूर्व अतिवृष्टीमुळे आष्टी परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आमदार श्री मेटे यांनी पिक विमासाठीच्या अडचणी आणि मांजरा धरण पूर नियंत्रण त्रुटी नमूद केल्या. आमदार श्री पवार यांनी ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचे प्रश्न गंभीर असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या आणि विविध विभागांचे जवळपास १६४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला .
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री संतोष राऊत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर यासह सार्वजनिक बांधकाम विभाग , कृषि, जलसंपदा विभाग, महावितरण, पिक विमा कंपनी , आदी विभागांनीआज पर्यंत झालेले पंचनामे व नुकसानीचे अहवाल सादर केले.