October 17, 2021

राममंदिराच्या पुजाऱ्याला फौजदाराने केली मारहाण !

राममंदिराच्या पुजाऱ्याला फौजदाराने केली मारहाण !

गेवराई – पोराला बोलल्याचा राग डोक्यात धरून फौजदाराने राममंदिराच्या पुजाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने गावकऱ्यात संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी फौज दाराच्या निलंबनासाठी चकलांबा पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले .नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी मात्र आपल्या या सैतानी प्रवृत्ती असणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घातले आहे .

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे यांनी पोलीस ठाण्याचे फौजदार दिगंबर पवार यांच्या मुलाला मंदिर परिसरात लघुशंका करण्यास मनाई केली होती .

याबाबत मुलाने वडिलांना तक्रार केल्यानंतर डोकं फिरलेल्या पवार यांनी कुठलाही विचार न करता देशपांडे यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत लाथा बुक्यांनी मारहाण केली .देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

या संदर्भात गावकऱ्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घेराव घातला,नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचे आश्वासन दिले.मात्र निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *