पुणे – प्रसिद्ध साहित्यिक, विनोदी लेखक,कथाकार द मा मिरासदार यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले .मृत्यूसमयी त्यांचे वय 94 वर्ष होते .त्यांच्या निधनाने साहित्यिक जगतावर शोककळा पसरली आहे .
मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्.ए. झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
मिरासदार यांनी ललितलेखनही केले आहे. सरमिसळ, गप्पांगण हे त्यांचे ललित लेखसंग्रह देखील गाजले. ललित लेखनासोबतच मिरासदार यांनी एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका सु्ट्टी व पाच एकांकिका या नावाने प्रसिद्ध आहेत.