October 17, 2021

शुक्रवारी 48 पॉझिटिव्ह !

शुक्रवारी 48 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2353 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2305 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 6 बीड 12 गेवराई 2 केज 1 माजलगाव 3 पाटोदा 12, शिरूर 2,असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही थोडी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०६३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १८७ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २५३ इतकी होती. तर, आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती.

आज राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७१ हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ४८४ इतकी आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *