December 6, 2022

किसनलाल मुनोत यांचे निधन !

किसनलाल मुनोत यांचे निधन !

बीड/ मुनोत क्लॉथचे संस्थापक आणि जैन धर्म ग्रंथांचे अभ्यासक किसनलाल मुनोत यांचे गुरुवार दि.30 सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी संथारा व्रत धारण केल्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 8 वाजता अमरधाम ,मोंढा रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन पुत्र,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

किसनलाल मुनोत यांनी शून्यातून विश्व निर्माण करतांना सचोटीने व्यवहार केल्यास यश मिळते हे तर दाखवून दिलेच पण या जन्मी केलेल्या पुण्याईचे मापही याच जन्मी पदरी पडते हेही सिद्ध केले. मुनोत क्लॉथचे संस्थापक जुन्या पिढीतील कपडा व्यावसायिक तथा जैन धर्म ग्रंथांचे अभ्यासक किसनलाल मुनोत यांनी संथारा व्रत धारण करून देह ठेवला त्यांचे हे निर्वाण त्यांच्या जीवित कार्याशी सुसंगत असेच आहे.,खऱ्या अर्थाने त्यांना सदगती प्राप्त झाली आहे.किसनलाल मुनोत यांनी व्यापारात प्रामाणिकपणे व्यवहार करून यश मिळवता येते हे दाखवून देत सचोटीला धार्मिक अधिष्ठान देऊन पुण्यकर्म देखील करता येते हे वैयक्तिक आचरणातुन दाखवून देऊन किसनलाल मुनोत यांनी आदर्श घालून दिला होता.

किराणा दुकानदार ते कपड्याचे प्रसिद्ध समृद्ध दालन उभे करणारे कष्टाळू जिद्दी व्यक्तिमत्त्व अशी त्यांच्या यशाची चढती कमान व्यावसायिकांना प्रेरणा देणारी आहे.त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर त्यांच्या शिकवणीनुसार त्यांचे सुपुत्र दिलीप मुनोत,राजेंद्र मुनोत, आणि संजय मुनोत हे वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.त्यांचे समाजकार्यातील योगदान हे होतकरू तरुणांच्या जीवनाला स्थैर्य देणारे होते. धार्मिक ग्रंथावरील त्यांचे लिखाण अभ्यासकांसाठी देखील मार्गदर्शक ठरलेले आहे.मुनोत परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click