October 17, 2021

गुरुवारी केवळ 29 पॉझिटिव्ह !

गुरुवारी केवळ 29 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2194 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 29 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2165 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 4 बीड 6 गेवराई 1 केज 4 माजलगाव 2 पाटोदा 5, शिरूर 2 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यात 42 रुग्ण कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात आज 42 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण एक लाख 2724 संख्या झाली असून आत्तापर्यंत 2768 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या 1.3 टक्के पॉझिटिव रेट असून रिकवरी रेट 97 टक्के आहे आत्तापर्यंत 99 हजार 643 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे राज्यात सध्या 36 हजार 675 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *