बीड – गोदावरी नदीपात्रात तब्बल 75 हजार क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने विसर्ग सुरू आहे,त्यामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे .
सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे व गोदावरी नदीवरील सर्व उच्चपातळी व मध्यम बंधारे हे पुर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामधून अतिरीक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी जिल्हयातील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव संतोष राऊत यांनी केले आहे.
जायकवाडी धरण 98.24%भरले असल्याबाबत कळविण्यात आले आहे.तसेच सध्या जायकवाडी धरणातून दि.29 सप्टेंबर 2021 रोजी 75456 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.येत्या काळात विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.तरी नदी पात्रात कोणीही उतरु नये , वाहने , पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवावे तसेच नागरिकांनी सुरक्षित व सतर्क राहण्याची खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.