बीड – जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा अंबाजोगाई, परळी,केज,गेवराई तालुक्यातील अनेक गावांना बसला .महापुरात अडकलेल्या तब्बल 77 लोकांना एनडीआरएफ,अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले .
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अग्निशमक दलाची पथके , महसूल , पोलिसाने विविध विभाग आणि स्थनिकांच्या सहकार्याने बचाव कार्य यशस्वी करत ७७ व्यक्तींना पूराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे, यासाठी झालेल्या बचाव कार्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून बोट उपलब्ध करुन देण्यात आली होती तसेच बीड नगरपरिषदेच्या आणि लातूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या शोध व बचाव पथकांनी सहभाग घेतला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात, घरांच्या छतावर आणि पुराच्या पाण्यात नागरिक अडकले. या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आपेगावच्या जवळ दाखल झाली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते, बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने १९ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आहेत
तसेच देवळा ता.अंबाजोगाई येथील ५८ जण मांजरा नदीच्या पुरात अडकले होते त्या सर्वांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले असून मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांत अधिकाऱ्यांकडून निवारा भेाजन आदी उपलब्ध करुन देत मदत कार्य सुरू आहे.