बीड – सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केज,अंबाजोगाई, धारूर,वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड,शिरूर तालुक्यातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.नदीला महापूर आल्याने आपेगाव येथील दहा शेतकरी अडकून पडले आहेत.तयांचया बचावासाठी एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्या आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.सोमवारी रात्रभर हहलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून बचावकार्य सुरू झालं आहे.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून दहा लोक शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर अडकले आहेत.
या नागरिकांना वाचण्यासाठी बीड येथून रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अर्धे आपेगाव पाण्यात आहे. शेतात असलेल्या बालाजी बाजीराव तट, दत्ता काळदाते, मनोज काळदाते यांच्या शेतात काम करणारे सालगडी व त्यांचे कुटुंब पाण्यात अडकले आहे. या तिघांच्याही शेतातील सालगडी आणि त्यांचे कुटुंब बालाजी तट यांच्या शेतात असलेल्या घराच्या स्लॅपवर बसले आहेत.
आजूबाजूला चारही बाजूने पाणी वाढत आहे. या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आपेगावच्या जवळ दाखल झाली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत