बीड- बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, काल (रविवार) रात्री धारूरमध्ये चिंचपूर येथे दुचाकीवरून नदी ओलांडताना दोघे पुरात वाहून गेले,महादेव सोनवणे आणि उत्तम सोनवणे अशी त्या दोघांची नावे आहेत .यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. दोघे पुरात वाहून गेले ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धारूर तालुक्यातील चिंचपूर येथे दुचाकीवरून नदी ओलांडत असताना दोघेजण पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह अजुनही सापडलेला नाही.
महादेव सोनवणे, उत्तम सोनवणे असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि.26) रात्री घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.