बीड – राष्ट्र उभारणी आणि पुढील पिढी घडवण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो त्यांचा गौरव करणे म्हणजे एकप्रकारची गुरुतत्वाची पूजा करण्या सारखे पवित्र कार्य आहे असे प्रतिपादन बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर ऑवर्ड शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमात केले.
रोटरीच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी हॉटेल अनविता मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एकूण 9 शिक्षकांना रोटरी नेशन बिल्डर ऑवार्ड म्हणजेच राष्ट्रशिल्पकार पुरस्कारा देऊन गौरव करण्यात आला या मध्ये
नवनाथ सरवदे(राजस्थानी विद्यालय) ,तांदळे सुग्रीव(जी प घोडका राजुरी),माधुरी गुरव(जी प बेलेवाडी),महेश गाडे(जी प ताडसोंणा),रेखा शितोळे(सेंट अन्स स्कुल),बाबी शिजू राजन(गुरुकुल इंग्लिश स्कुल,दत्तात्रय नलावडे(संस्कृती,छाया म्हात्रे(जी प नागपूर ब्रू),धर्मराज करपे(जी प धोंडराई विद्यालय)
या शिक्षकांचा गौरव करण्यात आला
याच कार्यक्रमात
वाय जनार्धन राव आणि रो मुकुंद कदम यांच्या डोनेशन मधून रोटरी क्लबच्या वतीने
9 गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे आयपीडिजी हरीश मोटवाणी यांनी करोना मुळे अडचणीत आलेल्या गरीब व होतकरू महिलाच्या सक्षमीकरना साठी रोटरीच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या शिलाई मशीन उपक्रमाचे कौतुक केले.
आगामी काळातही अश्या प्रकारच्या उपक्रमातून रोटरी वेळोवेळी मदतीसाठी पुढे येईल याची
ग्वाही दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब अधक्ष्य रो गणेश मुळे यांनी केले
यावेळी रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल
रो दादाराव जमालेपाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन रो नयना जोशी व रो सुनील जोशी या जोशी दाम्पत्यांनी केले तर आभार सचिव विकास उमापूरकर
यांनी मानले
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रोजेक्त चेअरमन म्हणून रो मुकुंद कदम रो प्रा सुनील खंडागळे यांनी काम पाहिलेकार्यक्रमास क्लब मधील सर्व सदस्य आणि पुरस्कृत शिक्षक वृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते