October 17, 2021

पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!

पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!

गेवराई – नदीवरील पूल वाहून गेल्याने कठड्यावरून नदी पार करणाऱ्या संदीपान संत या 35 वर्षीय युवकाचा नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.यापूर्वी तीन दिवसांपूर्वी या गावातील एका मुलीने आत्महत्या केल्याने तिचा मृतदेह खांद्यावर उचलून नदी पार करावी लागली होती,विकासाचे दावे करणारे पंडित आणि पवार या दोन्ही राजकारण्याबद्दल लोकांत यामुळे चीड निर्माण झाली आहे .

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली आहे. गावालगत असलेल्या अमृता नदीवरील पुल वाहून गेल्याने कठड्यावरुन नदी पार करताना गावातील एक पस्तीस वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवार (ता.२६) सकाळी नऊ वाजता घडली आहे.

 दोन दिवसांपूर्वी गावातील निकिता दिनकर संत (वय 17) या मुलीने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अक्षरशः नातेवाईकांना तो खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने अखंड महाराष्ट्राचे मन हेलावून गेले होते. त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजता बाहेरगावी जाण्यासाठी निघालेला गावातील तरुण सुदर्शन संदीपान संत (वय 35) हा पुलच नसल्याने कठड्यावरुन नदी पार करत होता. यावेळी पाय घसरून तो नदीत पडून वाहून गेला त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह धोंडराई येथील पुला जवळ आढळून आला.या पुलाने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. दरम्यान येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न बिकट असताना देखील प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. तर अशाप्रकारच्या दुर्देवी घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड चिड निर्माण झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *