बीड – येथील प्रथितयश अशा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने खळबळ उडाली आहे .सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेल्या सुभाष सारडा यांच्या बँकेवर प्रशासक आल्याने ठेवीदार घाबरून गेले आहेत .
बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात नावाजलेल्या मंत्री बँकेबाबत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या होत्या.रिझर्व्ह बँकेच्या ऑडिट मध्ये बँकेतील अनियमितता सामोर आली
दरम्यान बीडचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याने ठेवीदारांना धक्का बसला आहे .स्वतःला सहकार सम्राट म्हणुऊन घेत काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप,शिवसेना पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबध ठेवणाऱ्या सुभाष सारडा यांना हा मोठा झटका मानला जात आहे .