December 10, 2022

जिल्ह्यात शनिवारी 32 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात शनिवारी 32 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2027 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1995 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 4 बीड 14 गेवराई 2 केज 1 माजलगाव 1 पाटोदा 8 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात कालच्या तुलनेत करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित घटली असली, तरी कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार २८६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ३२० इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ९३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ०५० इतकी होती. तर, आज ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६१ इतकी होती.

राज्यात झालेल्या ५१ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ५७ हजार ०१२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजार ४९१ इतकी आहे.

लसीकरणाचा वेग देशात हळूहळू वाढत असून करोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील काहीसा कमी झालेला दिसून येत आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशात २९ हजार ६१६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ३१ हजार ३८२ इतका होता. त्यामुळे नव्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट गेल्या २४ तासंमध्ये दिसून आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत देशात ३ कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजघडीला देशात ३ लाख १ हजार ४४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे देशात सरासरी रिकव्हरी रेट हा ९७.७८ टक्के इतका झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click