बीड – अंगणवाडी महिला ,मदतनीस तसेच संजय गांधी निराधार च्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिव अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड या दोघांचे पाली जवळ भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले .
दिलीप भोसले हे आपल्या तीन सहकाऱ्यांसह अंबाजोगाई येथे कामानिमित्त गेले होते .रात्री उशिरा परत येत असताना त्यांच्या चारचाकीला पाली नजीक भीषण अपघात झाला.त्यांचे वाहन रस्त्याच्या मधोमध असलेल्या सिमेंट च्या दुभाजकाला जाऊन धडकले .
या मध्ये भोसले आणि गायकवाड यांचे जागीच निधन झाले तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत,त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .