बीड – राज्याच्या आरोग्य खात्यांतर्गत शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने उमेदवारांना धक्का बसला आहे.हजारो बेरोजगार परीक्षेसाठी लांब लांब च्या जिल्ह्यात पोहचल्यावर परीक्षा रद्द चा मेसेज आल्याने संताप व्यक्त केला जात आहे .
आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार होती,मात्र या परीक्षेसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले होते त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता .अनेक तक्रारी झाल्यानंतर आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वेळेत न मिळल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले .
या परीक्षेसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी ,उमेदवार लांब लांब च्या जिल्ह्यात गेले होते,अनेक विद्यार्थी हे एक दिवस अगोदर परीक्षा स्थळी पोहचले आहेत .एवढ्या लांब गेल्यानंतर आता आरोग्य विभागाकडून परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आल्याने गोंधळ उडाला आहे .