October 17, 2021

देवी पावली ! घटस्थापनेपासून मंदिर खुली !

देवी पावली ! घटस्थापनेपासून मंदिर खुली !

मुंबई – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याने येत्या 4 ऑक्टोबर पासून शाळा तसेच 7 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापना पासून मंदिर उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे .

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु करणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानंतर लगेचच आता राज्यातील मंदिरे देखील उघडण्याचा ठाकरे सरकारचा हा निर्णय समोर येत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *