नाशिक – महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं नेहमीच दिसून येत.शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे .भुजबळ यांनी डीपीडिसी मधील निधी विकल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे .त्यांच्या याआईओपणे खळबळ उडाली आहे .
नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. दरम्यान याबाबत चौकशीसाठी कांदेंनी थेट न्यायालयात धाव घेतल्याने राजकिय चर्चांना उधाण आलं आहे. सुहास कांदे यांच्या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात एका बैठकीतच जोरदार खडाजंगी झाली होती. यावेळी शिवसैनिकांनी मनातरी छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर हा वाद विकोपाला घेल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता पक्षप्रमुख काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.