बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2250 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2218 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 7 बीड 10 केज 4 पाटोदा 8 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
निदानराज्यात कालच्या तुलनेत काल करोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली असून कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ३ हजार ६०८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा ही संख्या ३ हजार १३१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार २८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी ही संख्या ४ हजार ०२१ इतकी होती. तर,काल ४८ रुग्णांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 282 जणांचा मृत्यू झालाय. यासह कोविड -19च्या एकूण मृत्यूची संख्या 4,46,050 वर गेली आहे. देशव्यापी कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत 83.39 कोटींपेक्षा जास्त डोस पूर्ण करण्यात आले आहेत.
भारतात बुधवारी 26,964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,35,31,498 झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे घटून 3,01,989 झाली आहेत. ही 186 दिवसातील सर्वात कमी वाढ आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता जारी करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 383 नवीन मृत्यूंसह मृतांची संख्या 4,45,768 वर पोहोचली आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये एकूण संक्रमणाच्या 0.90 टक्के समावेश आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे, तर राष्ट्रीय कोविड -19 पुनर्प्राप्ती दर 97.77 टक्के नोंदवला गेला आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वाधिक आहे.