October 17, 2021

बुधवारी 42 पॉझिटिव्ह तर 2100 निगेटिव्ह !

बुधवारी 42 पॉझिटिव्ह तर 2100 निगेटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2142 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 42 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 9 बीड 11 धारूर 1 गेवराई 2 केज 3 माजलगाव 4 पाटोदा 6 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

राज्यात आज 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 10, 875 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 40 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार अद्याप कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये काल दिवसभरात 26,964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर देशात काल दिवसभरात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मंगळवारी केरळमध्ये 15,768 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख 61 हजार 195 एवढी आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *