September 30, 2022

जिल्ह्यासाठी आणखी 43 रुग्णवाहिका !

जिल्ह्यासाठी आणखी 43 रुग्णवाहिका !

बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्याच्या उद्दिष्टातून आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्हा आरोग्य यंत्रणेस 43 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात या रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास (प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी) 31 आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये व ट्रामा केअर सेंटर्सला मिळून 12 अशा एकूण 43 रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

बीड जिल्ह्यात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटे दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेस 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी रुग्णवाहिकांची निकड व मागणी लक्षात घेत ना. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यानुसार बीड जिल्हा आरोग्य विभागास नवीन अद्ययावत व सर्व सुविधायुक्त 43 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून आठवडाभरात त्या बीड जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आरोग्य मंत्री ना. राजेशभैय्या टोपे व आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click