February 8, 2023

परळीच्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार !

परळीच्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार !

परळी – महाराष्ट्र शासनात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करणाऱ्या उच्च विद्या विभूषित परळीतील डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांची आतापर्यंत 25 पुस्तके प्रकाशित असून, 23 पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांनी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकाशवाटा या जीवन चरित्राचा संस्कृत अनुवाद लिहिला आहे.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सौ. मंजुषा कुलकर्णी ह्या परळीच्या कन्या असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण लिटल फ्लावर स्कूल मध्ये झालेले होते. आंबेवेस भागात राहणारे पंढरीनाथ कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत.

समकालीन मराठी साहित्य कृती किंवा अन्य कोणत्याही भाषेतील साहित्यकृती या संस्कृतात सहजपणे नेता येऊ शकतात आणि भारताची अभिजात संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते या भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार दिले जातात त्यात मराठी भाषेतील कलाकृतीला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यामुळे मराठी भाषेत आणि संस्कृत या दोघांमध्ये देखील अतिशय आनंदाचे वातावरण आहे प्रकाशवाटा हे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मचरित्र 2017 साली संस्कृत मध्ये डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी अनुवादित करून प्रकाशित झाले होते या पुस्तकाचे साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .मराठी पुस्तकाला संस्कृत अनुवादासाठी मिळालेला हा गौरव समग्र महाराष्ट्र आणि भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरते आहे.

डॉ.मंजूषा कुलकर्णी यांचे एम ए संस्कृत, एम एड, पी एच डी(संस्कृत) अनुक्रमे पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातुन सर्वप्रथम क्रमांकाने पूर्ण झालेले आहे. त्या MPSC परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या असून प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी म्हणून सेवेत आहेत.

पहिली महिला भाषासंचालक महाराष्ट्र राज्य म्हणून काम करण्याचा मान देखील सौ. मंजुषा यांना मिळालेला आहे. त्यांनी 21 वर्षे अध्यापनाचे देखील काम केलेले आहे. विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ख्यातनाम व्याख्याता, कवयित्री, लेखिका, निवेदिका, सूत्रसंचालिका, नाट्यप्रयोग, एकपात्री प्रयोग यांसह भाषेचं – साहित्याचं कार्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवन्याचे काम केलेल्या उत्कृष्ट साहित्यिक म्हणून डॉ. सौ. मंजुषा कुलकर्णी सुपरिचित आहेत.

धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन करतांना , आमच्या परळीची कन्या, आमची भगिनी सौ. मंजुषा कुलकर्णी यांना डॉ.प्रकाश बाबा आमटे यांचे प्रकाशवाटा हे आत्मचरित्र प्राकृत संस्कृत मध्ये अनुवादित केल्याबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. ताई, आपला हा गौरव म्हणजे आम्हा समस्त परळीकरांचा अभिमान आहे असे म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click