नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू काश्मीर प्रभारी तथा बीड जिल्ह्याच्या रहिवासी माजी खा राजनीताई पाटील यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अन राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आणि जम्मू काश्मीर च्या प्रभारी असणाऱ्या रजनीताई पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी देखील सुचविण्यात आले होते,मात्र राज्यपालांनी अद्याप या यादीला मंजुरी दिलेली नाही .
राज्यसभेचे खा राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसने राजनीताई यांची उमेदवारी जाहीर केली आहे .गेल्या तीस चाळीस वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा काँग्रेसने निष्ठेचे फळ दिले आहे .