नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून नावज्योत सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वाद अखेर मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्यापर्यंत गेला आहे.अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याने पंजाब मध्ये खळबळ उडाली आहे .
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीआधी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेतली होती. चंदिगढमधील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांच्या बाजुने असलेल्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. तसंच सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती.