October 17, 2021

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय !

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय !

बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत परळी मध्ये येऊन गोंधळ घालणाऱ्या करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम सोमवार पर्यंत वाढला आहे.त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे .

करूणा शर्मा पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आल्या असता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट नूसार गून्हा दाखल करण्यात आला होता. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

करुणा शर्मां यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी त्यांना अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती.

आज अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *