बीड – सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानचे संपर्क कार्यालय आता बीडला सुरू झाले आहे,त्यामुळे समर्थ भक्तांनी आता सज्जनगड येथील कार्यक्रमासाठी तसेच देणगी व इतर माहितीसाठी बीड येथील प्रा दीपक देशमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थानने केले आहे .
इ.स.1648 साली स्थापन झालेल्या आणि 373 वर्षांचा इतिहास व परंपरा असलेले सातारा जिल्ह्यातील सज्जनगड चे श्रीरामदासस्वामी संस्थान चे संपर्क कार्यालय आता बीड येथे सुरू झाले असून समर्थ भक्तांना आता सज्जनगड सेवेची संधी उपलब्ध होत आहे.
बीड जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामी यांचा मोठा भक्त संप्रदाय आहे .दोन वर्षांपूर्वी बीड शहरात समर्थांची भिक्षा फेरी आली होती,त्यावेळी बीडकर भक्तांनी उदंड प्रतिसाद देत आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले होते .त्यावेळीच बीड येथे संपर्क कार्यालय सुरू करण्याचा मानस अनेकांनी बोलून दाखवला होता .त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे .
ज्या भाविक भक्तांना श्री समर्थ समाधी अभिषेक,पुजा,उत्सव व इतर सर्व पारंपरिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी बीडच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल . अन्नदान,लहान मुलांसाठी संस्कार केंद्र,दासनवमी महापुजा,पाच पंचामृती पुजा, गुरूपौर्णिमा,नंदादीप,वैदीक पाठशाळा अशा सर्व सेवा प्रकाराचा लाभ घेता येईल.
अधिक माहितीसाठी प्रा.दीपक देशमुख,सी/8,अवधूत कॅम्पस ,गुजराती कॉलनी ,जालना रोड, बीड
फोन 9422295348 येथे संपर्क साधावा.