बीड – दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार बीड जिल्हा परिषदेने जाहीर केले आहेत मात्र गेल्या दोन वर्षातील पुरस्कार घोषित करण्याचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याने शिक्षक वृंदात नाराजीचा सूर आहे .
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो .2019 आणि 2020 या दोन वर्षात शिक्षक निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली मात्र कोरोनाच्या कारणामुळे पुरस्कार घोषित झाले नाहीत .
दरम्यान या वर्षी सुद्धा प्रशासनाने 5 सप्टेंबर रोजी पुरस्कार देणे अपेक्षित होते परंतु त्या दिवशी निवडीचा घोळ मिटला नाही,त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी उशिरा शिक्षक वृंदाची यादी जाहीर करण्यात आली .या सर्व 22 शिक्षकांना 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जाणार आहेत .
मात्र सलग दोन वर्षे शिक्षक पुरस्कार का दिले नाहीत,तिन्ही वर्षाचे एकदम देणे शक्य असताना जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच सीईओ आणि प्रशासनाने का टाळाटाळ केली असा सवाल शिक्षक विचारत आहेत .