बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2982 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 59 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2923 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 18 बीड 16, धारूर 3 गेवराई 5 केज 2 माजलगाव 4 परळी 1 पाटोदा 5 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात परवाच्या तुलनेत काल करोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. तर, कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढल्याने चिंताजनक आहे. तर दुसरीकडे दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ, आणि एकूण सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याने राज्याला थोडा दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार ७८३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ५३० इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ४ हजार ३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार ६८५ इतकी होती. तर, बुधवारी ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५२ इतकी होती.