बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2455 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 68 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2387 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 13 बीड 18, धारूर 2 गेवराई 4 केज 8 माजलगाव 1 पाटोदा 6 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कालच्या तुलनेत काल करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी कमी असल्याने आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभरात राज्यात ३ हजार ५३० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ७४० इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २३३ इतकी होती. तर, मंगळवारी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या २७ इतकी होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशात २५ हजार ४०४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ६२ हजार २०७ झाली आहे. तर काल दिवसभरात ३७ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २४ लाख ८४ हजार १५९ वर पोहोचली आहे.
देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.