September 27, 2021

गुटखा किंग मुळे आबा चा पोलिसांना गुंगारा ! साठ लाखाचा गुटखा पकडला !!

गुटखा किंग मुळे आबा चा पोलिसांना गुंगारा ! साठ लाखाचा गुटखा पकडला !!

बीड – बीड शहरातच नव्हे तर जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून अवैध पध्दतीने गुटखा आणून विक्री करणाऱ्या मुळे आबा या गुटखा किंग च्या गोदामावर पोलिसांनी छापा घालून साठ लाख रुपयांचा गुटखा पकडला.मात्र यावेळी पुन्हा एकदा मुळे आबा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला .

बीड जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री होते,मुळे आबा याच्यासह काही जण बाहेरच्या राज्यातून गुटखा विक्री करतात.पोलिसांना आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे .या सगळ्यांना मुळे नावाचा व्यक्ती गुटखा सप्लाय करतो .यापूर्वी पेठ बीड पोलिसांनी गुटखा पकडल्याचा देखावा केला होता मात्र त्यावेळी देखील मुळे पोलिसांच्या हाती लागला नव्हता .

बीडमध्ये केवळ छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केला जातो असे नाही तर चक्क गुटख्याचे गोदामच सुरू असल्याचे आता समोर आले आहे. या छुप्या गोदमाची माहिती गुप्त माहिती मिळताच आज बुधवारी (दि.१५) सकाळी नऊच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे व त्यांच्या कर्मचारी छापा मारला.


या कारवाईत एक-दोन लाख नव्हे तर तब्बल ६० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. महत्वाचे म्हणजे या कारवाईत केवळ दोन वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले असून गोदाम चालवणारे आणि काळ्या बाजारातून गुटखा बीडपर्यंत पोहोचवणारे मात्र अद्यापही पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.या कारवाईने गुटखा माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून आज बुधवारी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे ६० लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सर्व मुद्देमाल घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात मुळे नावाचा जो गुटखा किंग आहे तो मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करतो.मात्र पोलीस कारवाईत त्याला कधीच अटक झाल्याचे दिसून आले नाही.पोलीस मुळे वर का मेहरबान आहेत हे न उलगडणारे कोडे आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *