September 27, 2021

जिल्ह्यात 2202 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 2202 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2263 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 61 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2202 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 12 आष्टी 9 बीड 10, धारूर 1गेवराई 2 केज 5 माजलगाव 2 पाटोदा 4 परळी 1,शिरूर 2 वडवणी 13 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 57 रुग्ण कोरोनामुक्त

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात होऊ लागला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चांगली आहे काल दिवसभरात 57 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 522 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 2012 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 98 हजार 759 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, याचबरोबर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 2731जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दर 2.4 % टक्के असून डेथ रेट 2.67% टक्के इतका आहे बीड जिल्ह्यात 96.81 टक्के रिकव्हरी रेट असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय-निमशासकीय अशा 85 कोविड सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे 3403 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या 2897 बेड रिक्त आहेत

राज्यात आज 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.

राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

देशात आज 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकादिवसापूर्वी 28,591 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 37,687 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *