गांधीनगर – गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे .भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे .केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल,सी आर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब न करता नेतृत्वाने भुपेंद्र पटेल यांनी निवड केली आहे .
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक गांधीनगर येथे झाली .या बैठकीत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भुपेंद्र पटेल यांच्या नावाची शिफारस केली आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी अनुमोदन दिले .
भुपेंद्र पटेल हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत .आनंदी बेन पटेल यांच्या जागेवर ते विजयी झाले होते .मात्र महापालिका स्तरावर तसेच भाजप च्या पक्षीय पातळीवर त्यांचे काम मोठे आहे,अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित आहेत .