April 1, 2023

शिवाचार्य महास्वामींचे निधन !

शिवाचार्य महास्वामींचे निधन !

माजलगांव :
येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज (१० सप्टेंबर) रोजी दुपारी १ वा. वृध्दपकाळाने निधन झाले.ते. ९४ वर्षाचे होते.

गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगांवकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगांव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. माजलगांवकर महाराजांच्या जाण्याने देशातील सम्रगी वीरशैव समाज शोकसारात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला असल्याची प्रितिक्रिया हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री.श्री.श्री. १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेता व्यक्त केली. माजलगांवकर महाराजाचे निधन झाले त्यावेळी जगद्गुरू माजलगांव मठातच उपस्थित होते.

महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने ते गुरूवार सायंकाळीच माजलगांवी आले होते. या वेळी श्रीगुरू देवांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, अंबाजोगाईचे श्रीगुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज, पाथ्रीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पूर्णा येथील श्री गुरू डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माळकवठा येथील श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सह हजारो समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान माजलगांवकर महाराजांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधीविधी करण्यात येणार आहे.


गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. दि. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उुरी त्यांचा जन्म झाला. परुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगांव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकामध्ये महाराजांनी माजलगांव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगांव मठाचा विस्तार करून या मठाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोच्य स्थानी नेण्याची त्यांची कामगीरी नेत्रदिपक आहे.
सिध्दयोगी तपस्वी म्हणून सर्व जाती धर्मात लोकप्रिय ठरलेल्या माजलगांवकर महाराजांना त्यांचे तपःसामर्थ्य पाहुन रंभापुरी महापीठाचे तत्कालीन जगदगुरू श्री वीरगंगाधार शिवाचार्य भगवत्पाद यांनी तपोरत्नं या उपधीने गौरविले.

त्याच प्रमाणे वीरशैवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासातील त्यांचे अतुल्य योगदान लक्षात घेवून विद्यमान काशी जगदगुरू डॉ.श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी श्री क्षेत्र उद्धारक श्री प्रभु या उपाधीने सम्मानीत केले आहे.

चंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिकारी

वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारे माजलगांवकर महारज गेल्या एक महिन्यापासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होते. गेल्या आठ दिवासात त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्री केदार जगदगुरू गुरुवारी दि ९ सप्टेंबर रोजी माजलगांव येथे आले असता एकुण स्थिती लक्षात घेवून माजलगांव मठाच्या उत्तराधिकार्‍याचा पट्टाभिषेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व लगलीच शुक्रवारी सकाळी ११.०० यांच्या उपस्थितीत माजलगांव मठाचे उतराधिकारी श्री चंद्रशेखर स्वामी यांचा पट्टाभिषेक केला. मठाच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण श्री. ष.ब्र.१०८ चंद्रशेखर गुरु प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज असे करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click