September 27, 2021

जिल्ह्यात केवळ 41 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात केवळ 41 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2589 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2548 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 18 धारूर 2 गेवराई 1,केज 6 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 2 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आज करोना बाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. या बरोबरच काल झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढली असल्याने आजची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या ३ हजार ६२६ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ९८८ इतकी होती. तर, काल ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. परवा ही संख्या ३७ इतकी होती.

काल राज्यात झालेल्या ८६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०४ हजार ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतके झाले आहे.

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. अद्यापही दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे.

आरोग्यमंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून तीन कोटी 22 लाख 24 हजार 937 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 92 हजार 864 एवढी आहे.
आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यापैकी आतापर्यंत 4 लाख 41 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *