बीड – दोन दिवसांपूर्वी परळी मध्ये करुणा शर्मा यांच्या अटकेच्या निमित्ताने जो काही प्रकार घडला आहे त्यावर माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट केले आहे .परळी सुन्न आहे,मान खाली गेली आहे राज्याची ,या ट्विटमधून त्यांनी चाललेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे .
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत करुणा शर्मा यांनी परळीत येऊन वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या कलमाखाली अटक केली .

या प्रकरणी विरोधीपक्ष कारवाईची मागणी करत आहे.माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी या सगळ्या गोष्टीवर ट्विट केले आहे .अन्याय चुकीच्या लोकांचात ताकद असल्यामुळे होतो अस नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हिराऊ नये ,wrong president should not be set ! ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे,मान खाली गेली आहे राज्याची .अस ट्विट त्यांनी करत विरोधकांवर निशाणा साधला आहे .