अंबाजोगाई – जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या करुणा शर्माला अंबाजोगाई न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महिला आर्थिक विकास मंडळाच्या विशाखा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करुणा शर्मा आणि अरुण मोरे या दोघांवर परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता .शर्मा यांनी रविवारी परळी येथे पोहचल्यानंतर वैद्यनाथ मंदिर परिसरात घाडगे यांना शिवीगाळ केली होती .
त्यानंतर शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली होती .या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले .त्यावेळी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली .