बीड – भाजपचे माजी आ भीमसेन धोंडे यांच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी सरपंचाला हाताशी धरून 102 एक्कर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .या प्रकरणात दोन प्राध्यापकांसाह चार जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे .
आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथील शेख महंमदबाबा यांची १०२ एक्कर ईनामी जमीन खोटे दस्त ऐवज तयार करून बळकावल्या प्रकरणी चार व्यक्ती व खोटी साक्ष दिलेले दोन असे सहा व्यक्तीवर आष्टी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.०३) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २ वरिष्ठ प्राध्यापक १ विद्यमान सरपंच व अन्य १ असे ४ व्यक्तींना शुक्रवारी (ता.०३) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापक व एक प्राध्यापक पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाले. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याऐवजी चक्क ईनामी जमिनी प्राध्यापक बळकायला लागल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यात मस्जिद दर्गा मंदिर व इतर देवस्थानच्या ईनामी जमिनीचे बनावट दस्त ऐवज तयार करून खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील काही राजकीय पुढाऱ्यांनी महसूलचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे गोरखधंदा आजही सुरूच ठेवला आहे.
आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथील शेख महंमद बाबा या देवस्थानची सर्व्हे नंबर ७५, ७६, ७७, ८१/अ, ८१/आ मधील १०२ एक्कर खिदमत माश म्हणून ईनामी जमीन प्रदान करण्यात आली आहे. १९६० पासून या जमिनीचे वहिवाटदार म्हणून आमचे पूर्वज महंमद रतनभाई यांचे नाव ७/१२ अभिलेखात नोंद आहे. परंतु या जमिनीचे बनावट दस्त ऐवज तयार करून अजिनाथ त्रिंबक बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे (रा.आनंदवाडी ता.आष्टी) शेख मुस्ताक बादशहा (रा. कडा ता.आष्टी) यांनी देवस्थान अर्चक व अर्जदाराचे ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील नाव कमी करून प्रतिबंधित मालक म्हणून नोंद लावली आहे. तसेच या जमिनीशी संबंधित व्यक्ती हे अशिक्षित असून त्यांच्या १०० च्या बॉण्ड पेपरवर बनावट वारस प्रमाणपत्र करून नावाच्या पुढे मराठी उर्दू भाषेत सह्या मारल्या आहेत.
तर या खोट्या दस्त ऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल (सरपंच- रुई नालकोल ता.आष्टी) व शरद नानाभाऊ पवार (रा.रुई नालकोल ता.आष्टी) यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. या प्रकरणी शेख दस्तगीर महंमद (रा.रुई नालकोल) यांनी वरील व्यक्ती विरोधात शुक्रवारी (ता.०३) आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी (ता.०३) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास यातील ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शेख मुस्ताक बादशहा व सुरेश बोडखे हे पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या संस्थेतील सर्व कर्मचारी असून अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर सुरेश बोडखे हे आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक आहेत.