September 27, 2021

धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!

धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!

बीड – धनुभाऊ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आपण थेट बांधावर जाऊन धीर दिला त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे मात्र असाच दौरा एकदा आष्टी ते परळी काढा अन नद्यांचे विद्रुपीकरण करून वाळूचा धंदा करणाऱ्या तुमच्या स्वपक्षीयांसह इतरांचे ढोपर सोलून काढा !जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राजकीय वाळू माफिया निर्माण झाले आहेत अन पोलीस ,महसूल ला हाताशी धरून या लोकांनी नद्यांवर दरोडे घातले आहेत.तुम्ही इमोशनल आहात म्हणून एकदा मनावर घ्या नाहीतर हे लोक नद्यांच वाळवंट केल्याशिवाय राहणार नाहीत .

बीड जिल्ह्यात गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी,पाटोदा ,शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो .विशेषतः गेवराई तालुका हा तहसीलदार असो की उपविभागीय पोलीस अधीक्षक अथवा इतर कर्मचारी यांच्यासाठी सोन्याची खाण आहे . एक तहसीलदार या तालुक्यात महिन्याला दोन कोटी कमावतो अशी चर्चा आहे .

गेवराई तालुका म्हणजे सोन्याची खाण आहे कारण या तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप,शिवसेना यासह सर्वच छोट्या मोठ्या राजकिय कार्यकर्त्यांनी गोदावरीच्या पात्राची वाट लावली आहे .वाळूच्या जीवावर मोठं मोठे बंगले या कार्यकर्त्यांनी अन नेत्यांनी बांधले मात्र गोदावरीचे पूर्णपणे वाटोळे केले .

गेवराई तालुक्यातील वाळूच्या तस्करी मध्ये केवळ गेवराईचे नाही तर बीड,परळी,अंबाजोगाई, पुणे,मुंबई येथील पुढारी अन कार्यकर्ते सहभागी आहेत .या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत अस नाही,मात्र तुम्ही अद्याप का लक्ष घातले नाही हे न उलगडणारे कोडे आहे .

बीड जिल्ह्यात जो कोणी जिल्हाधिकारी किंवा एसपी येतो तो केवळ दाखवण्यासाठी एक दोन कारवाई करतो अन मग आपले उखळ पांढरे करून घेण्यात व्यस्त होतो .धनुभाऊ गेवराईचा गोदाकाठ असो की पोहनेर चे नदीपात्र अथवा शिरूर,आष्टी,पाटोदा तालुक्यातील नदीपात्र प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी हे वाळूच्या धंद्यात गुंतलेले आहेत .

गेवराईसारख्या ठिकाणी तर साधा तलाठी किंवा बिट अंमलदार यांचे टिप्पर अन हायवा आहेत .पुढाऱ्यांच्या शंभर दोनशे गाड्या भरून दिल्यावर हे लोक स्वतःच्या पाच पन्नास गाड्या भरतात. रात्री बेरात्री सर्रास वाळू उपसा सुरू असतो,यामुळे या भागातील गावांतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे .

शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी असोत की भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस चे पुढारी हे सगळेच वाळू माफिया शी साटलोट करून आपलं उखळ पांढर करून घेत आहेत .दोन तीन कोटीत टेंडर घ्यायचं अन त्यात दहा वीस जण पार्टनर घ्यायचे,दोन महिन्यात किमान तीन चार हजार हायवा वाळू उचलायची असा प्रकार सुरू आहे .

तेव्हा धनुभाऊ ज्या प्रमाणे आपण जिल्ह्याचा दौरा करून बळीराजाला धीर दिला तसच एकदा गेवराई,आष्टी,पाटोदा ,शिरूर परळी,माजलगाव या भागात दौरा करा अन वाळू माफिया अन त्यांना पाठीशी घालणारे एसपी पासून जिल्हाधिकारी पर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना कोपरापासून ते ढोपरा पर्यंत सोलून काढा .मान्य आहे यामुळे तुम्हाला अनेकांची नाराजी सहन करावी लागेल मात्र यामुळे तुम्हाला गोदमायचा आशिर्वाद नक्की मिळेल .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *