बीड – बीड जिल्ह्यात आज दि 2 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3498 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 83 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3415 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 21 बीड 10 धारूर 8 गेवराई 7 केज 10 माजलगाव 1 पाटोदा 5 शिरूर 8,वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कालच्या तुलनेत करोना बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तर, दैनंदिन मृत्यू वाढले आहेत. मात्र कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या थोडी घटल्याने हा दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ४ हजार ४५६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १९६ इतकी होती. तर दिवसभरात एकूण ४ हजार ४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. परवा ही संख्या ४ हजार ६८८ इतकी होती. तर, आज १८३ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १०४ इतकी होती.
काल राज्यात झालेल्या १८३ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतके झाले आहे.