बीड – रागाच्या भरात सख्या आईवर विळ्याने वार करीत जखमी केल्यानंतर मुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथे घडली.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
माली पारगाव येथील बापू मच्छीन्द्र कदम याचे आईसोबत वाद झाले.रागाच्या भरात बापू ने आई पारुबाई वर विळ्याने वार केले .यामध्ये पारुबाई या गंभीर जखमी झाल्या .त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .या घटनेनंतर मच्छीन्द्र याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .