बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी शंभर च्या आत आला आहे .4028 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 79 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .परळी तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आहे हे विशेष .
बीड जिल्ह्यात आज दि 1 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4028 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 79 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3949 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 29 बीड 21 धारूर 2 गेवराई 2 केज 7 माजलगाव 3 पाटोदा 6 शिरूर 1,वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत