November 26, 2022

धनंजय मुंडे यांनी केली मोदींची स्तुती !!

धनंजय मुंडे यांनी केली मोदींची स्तुती !!

अंबाजोगाई – अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या माध्यमातून राजकिशोर मोदी यांनी सहकार क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे अशी स्तुती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली .बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोरोना योध्याचा सन्मान करण्यात आला .

मागील 25 वर्षांपासुन सहकार क्षेत्रात अंबाजोगाई पिपल्स बँकेने सामाजिक बांधिलकीतून ग्राहक,ठेवीदार यांचा विश्वास संपादीत करून केलेली कामगिरी ही दैदिप्यमान व अभिमानास्पद आहे.मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात बँकेचे कार्य नवी दिशा देणारे आहे.दहा लाखांपासुन सुरू झालेला बँकेचा प्रवास 450 कोटी रूपये ठेवींपर्यंत पोहोचला यावरूनच सर्व सामान्यांचा विश्वास अंबाजोगाई पिपल्स बँकेवर असल्याचे प्रतिपादन करून अंबाजोगाई नगरपरिषद अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरीता शहरातील जलवितरण वाहिनीच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यात येईल याकरीता संबंधित खात्यांचे आधिकारी व आपण राजकिशोर मोदींसोबत लवकरच बैठक घेणार आहोत अशी ग्वाही राज्याचे सामजिक न्याय व विशेषा सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिली.तर यावेळी बोलताना राज्यमंत्री ना.संजय बनसोडे म्हणाले की,सहकार क्षेत्रात सातत्याने 25 वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणे ही सोपी बाब नाही.राजकिशोर मोदींनी सर्वधर्मियांना सोबत घेवून बँकेच्या माध्यमातून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले व अर्थकारणाला बळकटी आणली.पुढील काळात बँकेने अशाच पद्धतीने कार्य करावे अशा शुभेच्छा ना.बनसोडे यांनी दिल्या.

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा रविवार,दि.29 ऑगस्ट आज रोजी सायंकाळी 6 वाजता अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी प्रास्ताविक करताना बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की,शहरातील अंबाजोगाई पिपल्स को-ऑप.बँकेने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अल्पावधीत सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून सहकार आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत बँक आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे.1996 साली स्थापन झालेल्या बँकेचे 2021 हे रौप्य महोत्सवी वर्षे आहे.यानिमित्त बँकेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.या उपक्रमाची सुरूवात आज रविवार,दि.29 ऑगस्ट रोजी कोरोना योद्धांचा सन्मान करून करण्यात येत आहे.1996 साली केवळ 10 लाख रूपये एवढ्या अत्यल्प भागभांडवलावर स्थापन झालेल्या बँकेने 450 कोटी रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत,व्यापारी,सुशिक्षीत बेरोजगार यांना मदतीचा हात दिला आहे.दोन विस्तारीत कक्षासह 16 शाखा आहेत.

दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख व दिवंगत लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर यांच्या प्ररेणेने बँकेचे कार्य सुरू आहे.बँकेच्या माध्यमातून कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून काम करण्यात आले.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कार्य केले ते कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.याबद्दल ना.मुंडे यांचा नागरी सत्कार केला पाहिजे असे सांगून कोरोना काळातील तत्पर कार्याबद्दल मोदी यांनी ना.मुंंडे यांचे आभार मानले.त्यानंतर मनोगत व्यक्त करताना माजी आ.वैजनाथराव शिंदे यांनी राजकारणात राहूनही मोदी यांनी सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याचे शिंदे यांनी सांगितले.तर माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सर्व धर्म समभाव जोपासत राजकिशोर मोदी यांनी पिपल्स बँकेला नवी उभारी दिल्याचे नमूद केले.माजी आ.अमरसिंह पंडीत यांनी कोविड योद्धांचे आभार माणून कुठलाही राजाश्रय नसताना पिपल्स बँकेने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले.या प्रसंगी अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ व रौप्य महोत्सव वर्षे सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते व स्वच्छता व पाणी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम),मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले.

या कार्यक्रमात अनिकेत लोहिया,शेख मुक्तार,प्रसाददादा चिक्षे,विजय रापतवार (शिक्षक मैत्री प्रतिष्ठाण),भारतीय जैन संघटना,दत्तप्रसाद लोहिया,कौस्तुभ कोदरकर,धोंडीबा शिंदे,रोटरी क्लब अंबाजोगाई,हमीद चौधरी,शरदअण्णा लोमटे (योगेश्वरी देवल कमिटी),अ‍ॅड.संतोष पवार,प्रेमचंद लोढा, शिवजन्मोत्सव समिती,डॉ.शेख लतीफ (उम्मीद ट्रस्ट),आई प्रतिष्ठाण,पेशवा युवा व महिला संघटन, नगसेवक संजय गंभीरे,राजकुमार गायके (श्रीराम जन्मोत्सव समिती), जमीएत-ए-उलेमा हिंद,हकीमलाला पठाण,श्रीमती ठकुबाई बालचंद सोळंकी,सिद्दीकी,गजराई प्रतिष्ठाण,शाम सरवदे (जनसहयोग) प्रशांत शिंदे,अंजली पाटील,ताराचंद शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील अंबाजोगाई पिपल्स को.ऑप.बँकेचे सभासद,ठेवीदार,हितचिंतक,ग्राहक आणि नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे,प्रा.अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार रोहिणी पाठक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click