बीड- महाविद्याकास आघाडी सरकारचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या शासकीय बैठकीला कोणतेही संवैधानिक पद नसताना शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख आजूबाजूला बसले होते तर दोन आमदार मात्र साईड ला बसल्याचे दिसून आले .कोणतेही पद नसताना या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी कोणत्या अधिकारात बसू दिले असा सवाल उपस्थित होत आहे .
राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली तसेच रोहयो आणि फलोत्पादन खात्याच्या कामाचा प्रगती बाबत माहिती जाणून घेतली .
या बैठकीला बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि विधान परिषद सदस्य आ संजय दौड हे दोघे आणि माजी मंत्री बदामराव पंडित हजर होते .मात्र हे तिन्ही लोकप्रतिनिधी साईडच्या खुर्चीवर दिसून आले तर बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि माजलगाव चे जिल्हाप्रमुख आबासाहेब जाधव हे मंत्र्यांच्या डाव्या उजव्या खर्चीवर दिसून आले .

जे आमदार लोकांमधून निवडून आले आहेत त्यांना साईड कॉर्नर करून मंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्या या पदाधिकारी यांच्याकडे नेमके कोणते शासकीय पद आहे त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बैठकीत बसू दिले अशी चर्चा सुरू झाली आहे .
आयजीच्या जीवावर बाजयी उदार असा कारभार करणाऱ्या या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या पुढे पुढे काय करायचे ते करावे पण लोकप्रतिनिधी यांना डावळण्याचा अधिकार कोणी दिला,अन ते बैठकीत बसले असताना जिल्हाधिकारी काय करत होते असा सवाल उपस्थित होत आहे.