February 2, 2023

वाळू माफिया, पुढारी अन अधिकाऱ्यांना प्रशासन सोलून काढणार का?

वाळू माफिया, पुढारी अन अधिकाऱ्यांना प्रशासन सोलून काढणार का?

बीड – वाळूच्या माध्यमातून गोदापात्राची चाळणी करून आपलं उखळ पांढर करून घेणारे पुढारी आणि अधिकारी यांच्यातील मिलीभगत कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.नूतन जिल्हाधिकारी शर्मा यांच्यामुळे का होईना एसपी राजा रामस्वामी यांना गोदापात्रात जावं लागलं.जर कलेक्टर आणि एसपी गेल्यावर सहा सात हायवा सापडत असतील तर महसूल अन पोलीस विभागाचे अधिकारी अन कर्मचारी झोपा काढतात का?अशा कामचुकार अन पैसे खाऊवर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बीड जिल्ह्यात गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी ,शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो .त्या त्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते हे वाळूच्या धंद्यात असतात.हा सर्वांनी नदी पात्राची पूर्ण चाळणी केली आहे .

विशेषतः सगळ्यात जास्त वाळू ज्या गेवराई तालुक्यातील गोदापात्रात भेटते त्याठिकाणी शिवसेना असो की भाजप अथवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी,सरपंच यांनी हातात हात घालून लुटण्याचा उद्योग केल्याचे दिसून येते .

गोदापात्र खरडून साफ करण्याचे पाप ज्यांनी ज्यांनी केले आहे ते कधी गेवराईचे आमदार,मंत्री,जी प सदस्य,नगराध्यक्ष राहिलेले आहेत.त्यामुळे येथे येणारा तहसीलदार असो की पोलीस उपअधीक्षक अथवा पोलीस निरीक्षक प्रत्येक जण या पुढाऱ्यांच्या दरबारात जाऊन मुजरा करतात अन आपला हिस्सा घेऊन गप्प बसतात.

या तालुक्यात कोणालाही वाळू उपसा करायचा असेल तर मोठ्या” युद्धात”जित हसील करावी लागते किंवा मग “विजय” मिळवून आपणच सिंह असल्याचे दाखवून द्यावे लागते.हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरू आहे,कारण तलाठी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ,नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ,पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सपोनि असे सगळेच यामध्ये सहभागी असतात.

दोन दिवसांपूर्वी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी वाळूपट्यात जाऊन कारवाई केली,याचा अर्थ लिलाव नसताना वाळू उपसा सुरू आहे,मग हे पोलीस अन स्थानिक महसूल प्रशासनाला दिसत नाही का.जर अशा लोकांच्या निगराणीत हे प्रकार होत असतील तर मग या अधिकाऱ्यांवर दंडात्मक अन निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click