August 20, 2022

पुढच्या महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा !

पुढच्या महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा !

मुंबई- राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहे .राज्य मंडळाने याबाबत माहिती दिली आहे.

दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार लेखी, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत, तर बारावीची १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे’, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click